… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन

मुंबई । सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती. मात्र राज्यपालांनी याबाबत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी वृत्तावाहिन्यांच्या वृत्तानूसार, शरद पवार यांनी स्वत: राज ठाकरेंचा फोन आला असल्याची माहिती दिली आहे. मला राज ठाकरे यांचा फोन आला. यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरेंनी चर्चा केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच राज ठाकरेंसोबत भेटण्याबाबत अजून काही ठरलं नसल्याचंही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी, पूर्वी दोन हजार रुपये बिल यायचं, त्यांना १० हजार बिल आलंय आणि ज्यांना ५ हजार रुपये बिल यायचं त्यांना २५ हजार आलंय. लोकांकडे रोजगार नाहीत. हाताला काम नाही. घरी पैसे येत नाहीत. अशावेळी ते बिल कसे भरणार, असा सवाल उपस्थित करत सरकारनं लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. मात्र राज्यपालांनी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सरकारमधे शरद पवारांचं ऐकलं जातं. त्यामुळे आपणही शरद पवारांशी एकदा बोला. मी सरकारला पत्र पाठवेन, पण त्यावर सरकार काही करेल का, याबद्दल मला शंका आहे. म्हणून आपण शरद पवारांशी बोललात तर हा प्रश्न सुटू शकतो. पण तरीही मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलेन आणि जे काही करता येईल ते निश्चित करेन”, असं राज्यपालांनी राज ठाकरेंना सांगितलं होतं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com