वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । वीजबिल माफीचा निर्णय सोमवारपर्यंत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. त्यानुसार या आंदोलनाची पहिली ठिणगी विदर्भातून पडणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. (MNS warns to protest from tuesday over inflated power bills)

वीजबिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. विदर्भातील हिंगणघाट शहरात मनसेकडून मंगळवारी मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचा निषेधही नोंदवण्यात येणार आहे.

दरम्यान, काल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात सोमवारनंतर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सोमवारनंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील. आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment