अशा वेळी आंदोलनाचं खूळ डोक्यात आलं तरी कुणाच्या? अजित पवारांचा भाजपला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले ‘काळे झेंडे’ आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या सरकार विरोधात आंदोलन करण्याच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही, असा टोला हाणतानाच आज महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणे हा समस्त करोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.

दरम्यान, राज्य या आव्हानांचा यशस्वी सामना करत असताना भाजपने काळे झेंडे सारखे आंदोलन करून महाराष्ट्रातील कोरोना योद्ध्यांचा अपमान करू नका. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नका. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा, महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नका, असं कळकळीच आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment