MPSC परीक्षा पुढे ढकलण्यावरुन छगन भुजबळ नाराज? म्हणाले..

मुंबई । MPSC परीक्षा पुढे ढकलण्यावरुन राज्याचे अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने त्यावर जास्त चर्चा करता येणार नाही असं ते म्हणाले आहेत. परीक्षा वेळेत झाली पाहिजे असंही काही जणांचं मत होतं हे त्यांनी नमूद केलं. परीक्षा रद्द करू नये, हे माझं वैयक्तिक मत आहे असंही ते म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

“मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बैठकीत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त चर्चा करता येणार नाही. पण यावर दोन्ही बाजू होत्या हे नक्की आहे. काही लोकांचं परीक्षा झाल्या पाहिजेत तर काहींचं परीक्षा होता कामा नये असं म्हणणं होतं. मी माझं मत सांगितलं होतं, मुलं तयारी करत असतात. तसंच मराठा कुणबी, कुणबी मराठा या माध्यमातूनही ओबीसी समाजाची मुलं येत असतात. पण काल मुख्यमंत्र्यांनी कोविडची समस्या, परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी याचा विचार केला आहे आणि परीक्षा पुढे ढकलल्या आहेत,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. जेवढ्या परीक्षा पुढे ढकलू तेवढं वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का आडवत आहोत. भरतीच्या आड कोणी यावं असं मला वाटत नाही,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर ओबीसीवर करतात का अजून कोणावर करतात ते बघावं लागेल,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com