खडसेंच्या तक्रारीमुळे गिरीश महाजन अडचणीत; ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. त्यात आणखी एक हादरा म्हणजे, जळगाव बी एच आर पतसंस्थेवर खडसेंच्या तक्रारीमुळे कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बी एच आर पतसंस्थेमध्ये भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरही (Girish Mahajan) कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात एकच रर्चा रंगली आहे.

या तक्रारीमुळे एकनाथ खडसेंनकडून गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरंतर, 2017 पासून खडसेंनी दिल्लीकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र, भाजपामध्ये फडणवीस आणि खडसे राजकीय वैर असल्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता भाजपलासोडचिट्ठी देत खडसेंनी पुन्हा एकदा तक्रार करत गिरीश महाजन यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे आता महाविकास आघाडीत असल्याने त्यांनी केलेल्या अनेक तक्रारींची दखल घेतली जात आहे. खडसेंच्या पाठपुराव्यामुळे पतसंस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर चौकशीत आर्थिक गुन्हे शाखेला गिरीश महाजन यांचे एखादे पत्रही सापडलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर आज एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.

खरंतर, फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. यामुळे आता पुढे दोन्ही पक्षांत या दिग्गज नेत्यांमुळे कोणता वादंग उभा राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. (Eknath khadse complain against BHR Credit unions will action be taken against Girish Mahajan too)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

Leave a Comment