‘भारत विषारी वायू सोडणारा देश!’ पंतप्रधान मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची मुक्ताफळं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. “भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.कोरोनाचं संकट असतानाच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. निवडणूक उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे.

ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला. ‘अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे’ असं म्हणत हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलाबाबत घेतलेल्या भूमिकेवर यापूर्वीही टीका करण्यात आली आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यासोबत ट्रम्प यांचा वादविवाद जवळपास ९० मिनिटे चालला. गेल्या ३५ वर्षाच्या तुलनेत आपल्या नेतृत्वात कार्बन उत्सर्जनाची स्थिती सर्वात चांगली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ‘आम्हाला अब्ज रुपये खर्च करायचे होते आणि आमच्याशी भेदभाव केला जात होता, म्हणून आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो’, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. जलवायू परिवर्तनाच्या मुद्द्यावर भारत, रशिया आणि चीनसारख्या देशांनी योग्य पावलं उचलली नसल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.

दरम्यान कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांची यादी पाहिली तर जगात सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये चीनचा पहिला क्रमांक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. तर भारत आणि युरोपिय संघ क्रमश: तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळं ट्रम्प यांच्या टीकेला आता त्यांचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment