सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणाला स्थगितीनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्वाची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना २०२० – २१ या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या असून यासंदर्भातच सरकारची पुढील भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे.

संध्याकाळी साडे ६ वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार तसेच राज्याचे महाधिवक्ता, राज्य शासनाचे वकिल आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत प्रामुख्यानं सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि पुढील रणनितीवर चर्चा होणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण स्थगितीसाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी जबाबदार आहेत. महाधिवक्ता कुंभकोणी एकाही सुनावणीला हजर राहिले नाही, असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्य सरकारी वकील अॅड. निशांत कातनेश्वर यांनी केला आहे. पूर्वी मराठा आरक्षण केस लढवलेल्या वकिलांशीही महाधिवक्त्यांनी चर्चा केली नसल्याची टीका, कातनेश्वर यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment