राहुल-प्रियांका गांधी पोहोचले हाथरस पीडितेच्या कुटुंबाच्या घरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हाथरस । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथ पीडितेच्या गावी पोहचले आहेत. याठिकाणी त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह फक्त ५ जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली होती. याशिवाय कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात त्यांना आलं होत.

यापूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी काँग्रेसच्या ३५ खासदारांसह हासरथसाठी निघाले होते. मात्र त्यांना तो पर्यंत परवानगी मिळालेली नसल्याने ते हाथरसला पोहोचू शकतील का असा प्रश्न होता. मात्र मला कुणीही हाथरसला जाण्यापासून रोखू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यामुळे पोलिस प्रशासन आणि सरकारवर मोठा दबाल आला. त्यानंतर राहुल गांधी यांना ५ लोकांसह हासरथला जाण्याची परवानगी देण्यात आली.

डीएनडीवर पोहोचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियमांचे आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची माहिती नोएडाचे पोलिस सहआयुक्त रणवीर सिंह यांनी दिली होती. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घराभोवती मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. या मुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment