भयंकर! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; नराधमच्या चाव्याने मुलीचा ओठ तुटला

औरंगाबाद । औरंगाबादमध्ये बलात्काराची अंत्यत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. अंगाचा थरकाप उडवणारी बाब म्हणजे नराधम आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (rape on 7 year old girl in aurangabad)

औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना आहे. एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तिने रोखण्याचा प्रयत्न केला असता नराधमाने तिच्या ओठाचा चावा घेतला. यामध्ये चिमुकलीचा ओठ तुटल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडित मुलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला असता नराधम फरार झाला.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, लहान वयात असा धक्कादायक प्रकार घडल्याने पीडितेला धक्का बसला आहे. तर आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. (rape on 7 year old girl in aurangabad)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com