कार्यकर्त्याच्या हट्टापायी उदयनराजे झाले बाईकवर सवार, अन पुढे असं काही घडलं…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । खासदार उदयनराजे भोसले नेहमी आपल्या हटके स्टाईलसाठी चर्चेत असतात. उद्यनराजेंचे गाड्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. पण उदयनराजेंचे बाईक चालवण्याची क्रेझ पहिल्यांदाचं सातारकरांनी अनुभवली. सध्या सोशल मीडियावर उदयनराजेंचा एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. उदयनराजेएका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. शिवाय गाडीत काही वेगळं केलं असेल तरीही ते उदयनराजेंना दाखवायला येतात. असच काहीसं गुरुवारी (22 ऑक्टोबर) घडले.

उदयनराजे दुपारी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची सोडवत होते. त्यावेळी प्रतिक कांबळे नावाचा एक कार्यकर्ता जलमंदिरात त्याची स्वत:ची कावासकी 800 ही गाडी घेऊन जलमंदिरात घेऊन आला. राजेंना त्याने गाडी दाखवताना त्यांनी ही गाडी चालवून पाहावी असा त्याने आग्रह धरला. उदयनराजे तसे थोडे खुशच होते. कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत ते बाईकवर स्वार झाले. त्यांनी

उदयनराजेंनी पहिला गिअर उचलत गाडी स्टार्ट करत स्पीड वाढवला. जलमंदिरापासून ते नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावापर्यंत त्यांनी दोन राऊंड मारले. पण हे राऊंड काही साधे नव्हते. राजे खुश असल्यामुळे त्यांच्या गाडीने केव्हा शंभरच्या पुढ वेग गाठला समजलेच नाही. परंतु गाडीचा राऊंड मारताना मात्र त्यांच्या स्पीडने जलमंदिरातील उपस्थितांच्या छातीचा ठोका चुकला. तसं तर राजकारणातल्या कोणत्याही पक्षात ते गेले की त्यांचा स्पीड असाच काहीसा असतो.

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment