शिवसेनेची वचनपूर्ती! राम मंदिर निर्माणासाठी अशी केली मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अयोध्येत ५ ऑगस्टमध्ये राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर जाणार उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील अनेक मान्यवरांना या भूमिपूजनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र , शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचे आमंत्रण न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी १ कोटी रुपयांची घोषणा आधीच केली होती. पण ही रक्कम राम मंदिर ट्रस्टला मिळाली नसल्याचा दावा तिथल्या महंतांनी केला होता. या पार्श्वभूमीवर १ कोटी रुपये दिल्याची माहिती शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दिली.

शिवसेनेने पैसे देण्याचे वचन दिले होते मात्र आतापर्यंत पैसे मिळाले नसल्याचे महंत नृत्य गोपाल दास यांनी म्हटले होते. याला अनिल देसाईंनी उत्तर दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ६० व्या जन्मदिवशी २७ जुलैला ही रक्कम श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात टाकण्यात आल्याचे देसाई म्हणाले. ही रक्कम मिळाल्याची माहिती देखील आमच्याकडे आल्याचे देसाई म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मार्च २०२० मध्ये अयोध्या यात्रे दरम्यान मंदिर निर्माणसाठी शिवसेनेकडून एक कोटी देण्याचे वचन दिले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment