‘यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार’; ‘ऑनलाईन’ मेळाव्याच्या चर्चेला संजय राऊतांचा फुलस्टॉप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर परिणाम झाला असून अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यावरही यंदा कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. कुणी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. (shiv sena leader sanjay raut on Dussehra rally)

संजय राऊत म्हणाले, ‘दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या या मेळाव्याचे महत्त्व आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण मी आजच वाचलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करू…नियम वैगरे आहेतच. शेवटी या राज्यात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. सरकारने काही नियम केले आहेत. कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही, असं सांगतानाच दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होईल. मला वाटतं यंदाचा दसरा मेळावाही व्यासपीठावरच होईल. काही मार्ग काढता येईल. चर्चा सुरू आहे. यंदा प्रथमच ठाकरे मुख्यमंत्री आहेत. बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, ‘असं राऊत म्हणाले.

३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर पहिला मेळावा
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे झाला होता. शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेसाठी शिवतीर्थ. याठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानं आणि शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दसऱ्याच्या दिवशी दणाणून जायचा. शिवसेनेचा दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत. या मेळाव्यातून बाळासाहेब राज्य तसेच देशाच्या राजकारणावर आसूड ओढत असे. प्रथा आणि परंपरेनुसार दसरा मेळाव्यात पहिल्यांदा शस्त्रपूजा केली जाते, त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भाषण होत असे आणि सर्वात शेवटी पक्षाचे प्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment