‘आरेतील जंगल वाचवून उद्धव ठाकरे मोदींचाचं राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेतायत!’- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथील सरकारी जमिनीवर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या भूमिकेला विरोधी पक्षानं विरोध केला आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही हा निर्णय दुर्देवी असून अहंकारातून घेतला असल्याची टीका राज्य सरकारवर केली होती. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना पंतप्रधान मोदींच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पांची आठवण करून देत निशाणा साधला आहे. ‘आरेतील जंगल वाचवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे,’ असा खरमरीत टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

‘पंतप्रधान मोदी नेहमी पर्यावरण रक्षणाबाबत बोलत असतात. त्यांच्या कार्यकाळात गंगा शुद्धीकरण, वाघ वाचवा, जंगल वाचवा, या सारखे उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी आरेतील जंगलाचे क्षेत्र ६०० एकरावरुन ८०० एकरापर्यंत वाढवले त्यामुळं भाजप नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये ४० ते ५० जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार
शिवसेना बिहारमध्ये ४० ते ५० जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे. बिहारमधील स्थानिक पक्षांशी युती करून निवडणूक लढवेल. यासाठी बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी सेनेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं मी येत्या काही दिवसांत पाटण्याला जाणार आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment