सेना नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून भाजप महाराष्ट्रद्रोही का?- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी समजू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचाही समाचार घेतला. जयंत पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांनी आपला पराभव मान्य केल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रावर खापर फोडता येणार नाही म्हणून आता जयंत पाटील यांनी बोगस मतदारनोंदणीचा मुद्दा उकरून काढला आहे. आपण निवडणूक हारणार, याची जाणीव असल्याचे त्यांनी आतापासूनच कव्हर फायरिंग सुरु केली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाविकासआघाडी सरकारच्याविरोधात असंतोष आहे. महाविकासआघाडीतील कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जात आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर आपला रोष व्यक्त करतील, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment