अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करा! पायल घोषच्या भेटीनंतर रामदास आठवलेंची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. पायल घोषनं एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागनं माझ्यासोबत असभ्य वर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारावाई करा तेव्हाच या माणसाचं खरं रुप समोर येईल. या ट्विटमुळं माझ्या जीवाला धोका असून माझी मदत करा, असं म्हणत तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. रामदास आठवले यांनी नुकतीच पायलची भेट घेतली आहे, तसंच, दोघांनी आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

‘ऐरवी पोलिस लगेचच कारवाई करतात. अनुराग कश्यप मुंबईतच आहे तरीसुद्धा अद्याप त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाही. पायल घोषनं मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. पायलला सुरक्षा मिळेल, याविषयी मी स्वतःहून लक्ष घालणार आहे. पायलच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास यासाठी मुंबई पोलिस जबाबदार असतील. मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना याबाबत पत्र लिहणार आहे,’ असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

पायल घोष हिनं केलेले सर्व आरोप अनुरागनं फेटाळले आहे. त्यानं ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. आणखी आक्रमणं व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस, शांत बस. हे पण माहित आहे की, माहित नाही कुठल्या दिशेनं बाण येणार आहेत’, असं अनुरागनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment