सुशांत सिंह केसचा निकाल बिहार निवडणूक निकालादिवशी लागेल, तोपर्यंत.. ; शिवसेनेच्या नेत्यानं साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करून बिहार निवडणूक व सुशांत सिंह प्रकरणावरून टीका केली आहे.

“बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंह केसचा निकाल व एनसीबीचा अहवाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार. तसेच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील, त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,” असं म्हणतं सरनाईक यांनी विरोधांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून अनेक वळणं घेत हा तपस ड्रग्स प्रकरणावर थांबला आहे. ड्रग्ज सेवन प्रकरणाची चौकशी एनसीबीकडून सुरू असून, एनसीबीनं या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत इतर काही जणांना अटक केली आहे. याशिवाय एनसीबीनं याप्रकरणात बॉलिवूडमधील दीपिका पदुकोणसह, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर या अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

Leave a Comment