मेगास्टार रजनीकांत ‘या’ पक्षाकडून तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई । अभिनेते आणि तामिळ चित्रपटसृष्टीचे मेगास्टार रजनीकांत पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चिन्हं आहेत. रजनीकांत आपल्या ‘रजनी मक्कल मन्दरम’ पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत आहेत. रजनीकांत 30 नोव्हेंबरला याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्ये ‘रजनी मक्कल मन्दरम’ या पक्षाची स्थापन केली होती. मात्र गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे उमेदवार उतरवले नव्हते. परंतु 2021 मध्ये होऊ घातलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमधून पक्ष पहिल्यांदाच रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे सोशल मीडिया वापरकर्तेही रजनीकांतच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोक ट्विटरवर हे सतत ट्वीट करत आहेत.

दरम्यान, मागील 2 वर्षांपासून रजनीकांत अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर पुढाकार घेऊन बोलले आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीतील त्यांचे सहकारी कमल हसन यांच्या तुलनेत त्यांचा औपचारिक राजकीय प्रवेशाला मात्र बराच उशीर झाला आहे. दुसरीकडे अभिनेता कमल हसन यांच्या ‘मक्कल नीधी मैयम’ पक्षाने मागील लोकसभा निवडणुकीतही आपले उमेदवार उतरवले होते. (Megastar Rajinikanth prepares to contest Tamil Nadu Assembly elections)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment