सर्वसामान्यांना धक्का !! भाजीपाला आणि डाळींचे  दर गगनाला  भिडले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या देशात सर्वत्र कोरोना महामारीची साथ आहे. काही महिन्यांच्या संचारबंदीनंतर आता हळूहळू देशात पर्यायाने  राज्यात सर्व काही सुरळीत सुरु होते आहे.  मात्र आता महागाई गगनाला भिडली असून  सर्वसामान्य नागरिकांचे  आर्थिक गणित बिघडले आहे. भाजीपाल्यासह आता डाळीं देखील प्रचंड महागल्या आहेत.  इतर जीवनाश्यक वस्तूंचे दरही  वाढले आहेत. किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा  १६० ते १८० रुपये  प्रतिकिलो व शेवगा शेंगासह फरसबी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात  वाढले आहेत.  मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये  सप्टेंबरमध्ये प्रतिदिन  ५०० ते ६०० पेक्षा वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. मात्र सध्या ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे.

हरभऱ्याच्या  डाळींनंतर देशातील सर्वाधिक खप असलेल्या तुरीच्या डाळीचा भावही गगनाला भिडला आहे. मुख्य बाजारात आवक कमी  झाल्याने किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे घाऊक दर हा १०० रुपये प्रति किलो पेक्षा जास्त झाला आहे. तर किरकोळ दर हा १५० रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे. येत्या काही दिवसात ही परिस्थिती बदलली नाही तर किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान अनेक व्यापाऱ्यांनी तुर डाळ आयात करु द्यावी यासाठी परवान्यांची मागणी केली आहे. परंतु सरकारकडू अजून काही कार्यवाही झालेली नाही. तुर डाळीची किमत मंगळवारी ११५ रुपये प्रति किलो अशी होती.

मागील पंधरवाड्यात तूर डाळीची किंमत ही २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूर बाजारात येईल. तूर डाळीची मागणी साधरण ३ लाख टन असते. यामुळे नवीन उत्पन्न येईपर्यंत साधरण ९ लाख टन तुरीची आवश्यकता आहे. अशी माहिती ऑल इंडिया  डाळ असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी दिली आहे. ‘आवक कमी झाल्याने किंमती वाढतील अशी माहिती आपण शासनाला आधीच दिली आहे. अनेक वेळा आयात करण्यासाठी परवाने दिले जावे यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. सरकारने  या वर्षात ४ लाख टन तूर आयात करण्याचा मानस ठेवला आहे. पण आयातीसाठी परवाने अजून देण्यात आलेले नाहीत.’ असेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com