‘बाळासाहेबांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पदं दिली होती’; नारायण राणेंची स्पष्टोक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चवताळून प्रहार केला.

”मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पदं दिली. आम्ही वाघ होतो म्हणून मला मुख्यमंत्री पद दिलं होतं, असं नारायण राणे यांनी सांगितले. तसेच बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे. दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, असा इशारा देखील नारायण राणे यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही. पंतप्रधानांच्या कामावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. राज्यात 16 हजार कोटींचे उद्योग आणल्याचा उल्लेख केला तो फक्त कागदावर आहे, बेकारीचा उल्लेखच नसल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले. राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment