पुरुषांनी पॉवरफुल राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. सतत कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ताण तणाव असतो. त्यामुळे आहार व्यवस्थित जात नाही. दैनंदिन गोष्टीमुळे सुद्धा आणि बदलले राहणीमान, आहारातील बदल या गोष्टींमुळे शरीर मजबूत राहत नाही . वयाच्या तिसी नंतर अनेक पुरुषांनी आपल्या दैनंदिन गोष्टी आणि आहारात बदल करायला पाहिजे. कोणत्या पदार्थांमुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. जाणून घेऊया त्याबद्धल.

सोयाबीन मधील आयसोफ्लोवेन्स हे प्रोटेस्ट ला सुरक्षित ठेवत असल्याने प्रोटेस्ट कॅन्सर चा धोका निर्माण होत नाही. रोज 25 ग्रॅम सोयप्रोटिन खावे म्हणजे कोलेस्ट्रॉल चा स्तर वाढणार नाही.

मोड आलेले कडधान्ये—

मोड आलेले कडधान्य खाल्याने आपले शरीर मजबूत राहण्यास मदत होते. तसेच त्यामध्ये असलेले झिंक शरीराला फायदेशीर असते. मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर पुरुषांमधील नापुसंकीग पणा कमी करण्यास मदत करते.

शेंगदाणे—-

शेंगदाणे या मध्ये झिंक आणि स्निग्ध पदार्थ जास्त असतात. त्यामुळे याच्या सेवनाने पुरुषांमधील कमजोरी कमी होते.

लसूण —

पुरुषांनी नेहमी लसणाचे सेवन केले पाहिजे कारण लासणा मध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बेक्टरील हे गुण असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनसंस्था चागली राहते.

गवती चहा — पुरुषांनी नेहमी गवती चहा यांचे सेवन करावे कारण त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. चहामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिफिनॉल ऍसिड असते. त्यामुळे हा चहा पिल्याने कोणत्याही कॅन्सर चा धोका निर्माण होत नाही. फुफुस आणि इतर आतड्यांचे आजार निर्माण होत नाहीत.

आंबा आणि पपई—

आंबा आणि पपई यांच्यामध्ये जीवनसत्त्व ए मोठ्या प्रमाणात असते. आंब्यामध्ये अ, क आणि इ हे घटक असतात. पुरुषांनी या फळांचा आणि सालीचा समावेश त्यांच्या आहारात करावा. पुरुषांनी डाएट मध्ये याचा समावेश करावा.

शिमला मिरची —

याचा आहारात समावेश केला जावा कारण यामध्ये संत्र्याच्या रसापेक्षा तीन पट जास्त व्हिटॅमिन या मिरची मध्ये असतात.

दुधी भोपळा —

यामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

नाचणी —

यामध्ये कॅल्शियम चे प्रमाण जास्त असते. शरीराला कॅल्शियम पुरवण्याचे काम नाचणी करत असते. तसेच शरीराला झिंक आणि फायबर सुद्धा मिळते.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment