मुंबई पोलिसांनी केला मोठा TRP घोटाळा उघड; रिपब्लिक टीव्हीसह अन्य २ टीव्ही चॅनल्सचा सहभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केला आहे. या घोटाळ्यात ३ टीव्ही चॅनल्सची नाव समोर आली आहेत. अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनेचेही यात नाव आले आहे. या TRP घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु असल्याचे मुंबईच पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी गुरुवारी सांगितले. रिपब्लिक टीव्हीचे प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावले जाईल असे त्यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. . याच संदर्भात मराठीतील फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिनीच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. टीआरपी रेटींगचं सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीचा डेटा लिक झाल्याचीही माहिती मिळत आहे. यात कंपनीचे काही जुने तर काही विद्यमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासाठी घरात विशिष्ट चॅनेल सुरु ठेवण्यासाठी पैसे दिले जात होते. दरम्यान, काही दिवसांपासून वादात असलेला रिपब्लिकचे चालकही यात सहभागी असल्याचा शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या घोटाळ्यासंबंधी सविस्तर माहिती देताना परम बीर सिंह म्हणाले की, “BARC ही संस्था टीआरपी मोजण्याचे काम देशात करते. ही संस्था वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावते, देशात सुमारे 30 हजार बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबईत सुमारे 10 हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसांसोबत काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवरून डेटा शेअर करत असल्याचे उघड झाले आहे. हे कामगार लोकांना घरात विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यासाठी पैसे द्यायचे. जे लोक अशिक्षित आहेत त्यांच्या घरी इंग्रजी चॅनेल पाहिले जात असल्याची माहिती आहे.

परमबीर सिंह पुढे म्हणाले, आम्ही हंसाच्या माजी कामगाराला अटक केली आहे. या आधारे तपास वाढविण्यात आला. दोन जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांना 9 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी देण्यात आली आहे. त्याच्या काही साथीदारांचा शोध घेत आहोत. काही मुंबईत आहेत तर काही मुंबईबाहेर आहेत. ते चॅनेलनुसार पैसे द्यायचे. पकडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले असून आठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment