कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करा! सुब्रमण्यम स्वामींचा फुकटचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनामुळे तयार झालेली सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ आहेत. अशावेळी राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो असे ते म्हणाले.

इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच महाआघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील असा इशाराही त्यांनी राष्ट्रपती शासन लागू कारण्यासोबत ट्विटरवर देऊन टाकला आहे. आता महाविकास आघाडीचे नेते या सर्वाला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रमुख विरोधी पक्ष भाजप राज्यातील गंभीर होत चालेल्या कोरोना परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. कालच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र बचाव’ची भूमिका घेऊन राज्यपालांना निवेदन देण्यात आल्याचं सांगितलं. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण जनतेच्या वेदना मांडल्या नाही तर जनतेला न्याय मिळणार नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र बचाव’च्या माध्यमातून सरकारला टप्प्याटप्प्याने जागं करणार आहोत. यात कुणाला राजकारण वाटलं तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment