परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्राने आपल्याच रूममेटची गळा आवळून केली हत्या

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोलामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरात एका अल्पवयीन मित्राने आपल्या रूम पार्टनरची गळा आवळून हत्या केली आहे. मृत मुलाचे नाव प्रतीक लवंगे असे आहे. आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण
स्थानिक सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरातील एका खोलीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन अल्पवयीन तरुण नीट परीक्षेच्या तयारीकरिता राहण्यास आले होते. हे दोघेजण जिवलग मित्र असल्याने एकाच खोलीत भाड्याने राहत होते.

17 जून रोजी कुठल्या तरी कारणावरून या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. याच वादाच्या रागातून प्रतीक लवंगे या युवकाची त्याच्या रूम पार्टनरने गळा आवळून हत्या केली आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.