Fact Check-1 सप्टेंबरपासून देशभरात सर्वांचे वीज बिल माफ केले जाईल? सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीसंदर्भातील कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की, आता सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे. या अंतर्गत सप्टेंबरपासून प्रत्येकाचे वीज बिल माफ केले जाईल. याबाबत पीआयबीने हा दावा खोटा असल्याचे तपासले आहे. सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.

 

वीज बिल माफीची बातमी खोटी आहे
PIB Fact Check मध्ये असे म्हटले आहे की, या बनावट व्हिडिओमध्ये केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. अशी कोणतीही योजना आणणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. PIB Fact Check ने लोकांना अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

PIB Fact Check काय आहे ?
PIB Fact Check हे केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयीच्या चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काम करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी PIB Fact Check ची मदत घेतली जाऊ शकते. PIB Fact Check वर कोणीही स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा URL व्हाट्सअ‍ॅप नंबर 918799711259 वर पाठवू किंवा [email protected] वर मेल करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

You might also like