कॉफीपासून ते खेळण्यांपर्यंत अनेक गोष्टी महागल्या, यामागील कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कॉफीपासून खेळण्यांपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत जगभरातील वस्तूंच्या शिपिंगच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे परदेशातून येणार्‍या आयात वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे.

जगातील सर्वात स्वस्त वाहतूक जहाजांद्वारे होते. म्हणूनच, मालवाहतुकीच्या 80 टक्के वस्तू जहाजाद्वारे आणल्या जातात. यासाठी वापरल्या जाणार्‍या कंटेनरचे भाडे 547% वाढले आहे. एका बातमीत एका शिपिंग कंपनीने म्हटले आहे की,”चीनच्या शांघाय ते रॉटरडॅम पर्यंत 40 फूट कंटेनरचे भाडे 10,522 डॉलरवर पोहोचले आहे.”

खेळण्यांची किंमत जवळजवळ दुप्पट होऊ शकेल
खेळणी, फर्निचर आणि ऑटो पार्ट्सपासून ते कॉफी आणि साखर यासारख्या वस्तूंच्या किंमतीवरही लक्षणीय परिणाम होण्याची अपेक्षा आहे. यामुळे, जगातील अनेक देशांमध्ये महागाईशी आधीच झगडणाऱ्यांच्या खिशावर अधिक ओझे पडू शकेल. ब्रिटनमधील टॉय स्टोअरचे संस्थापक म्हणाले की,”खेळण्यांच्या किरकोळ व्यवसायाने मागील 40 वर्षांत अशी आव्हानात्मक परिस्थिती कधी पाहिली नव्हती. किंमत वाढवण्यावर इतका दबाव आहे की, ज्यामुळे खेळण्यांच्या किंमती जवळजवळ दुप्पट होऊ शकतात. यामुळे होणाऱ्या किरकोळ विक्रीवरील परिणामाबाबत ते म्हणाले की,” हो त्यावर परिणाम होईल.”

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे परिस्थिती आणखी वाईट बनली
शिपिंग कंटेनरच्या भाड्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील मागणीतील वाढ. यासह शिपिंग कंटेनरची कमतरता, बंदरांची कमतरतातसेच जहाजे आणि डॉक्सवर काम करणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाली आहे. यामुळे माल घेऊन जाणाऱ्या जहाजाच्या वेगावर परिणाम झाला आहे. आशियाई देशांमध्ये अलीकडेच कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

कंटेनरच्या शिपिंग खर्चात 200% वाढ होण्याची शक्यता
एचएसबीसी होल्डिंग्ज PLC चा अंदाज आहे की, मागील वर्षाच्या तुलनेत कंटेनरच्या शिपिंग खर्चात 205 टक्के वाढ होऊ शकते. याचा परिणाम वस्तूंच्या किंमतींवर दोन टक्के होऊ शकतो. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यापूर्वी शिपिंग खर्च फारसा गांभीर्याने घेतला जात नव्हता कारण तो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत एक छोटासा भाग होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment