आज पासून मनपाच्या 40 केंद्रावर लसीकरण सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | मनपाकडे सध्या 3 हजार 980 लसींचा साठा शिल्लक आहे. यात कोव्हॅक्सिन 300 तर कोवीशिल्डचे 3,680 डोस आहेत. आज 9 हजार लस प्राप्त होणार, त्यातुन 40 केंद्रावर लसीकरण केले जाईल अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली होती. शनिवारी 66 केंद्रावर 2,126 नागरिकांना लस देण्यात आली रविवारी लसीकरण बंद होते.

आज 40 पैकी 37 केंद्रावर फक्त 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असेल. तर तीन केंद्रावर कोव्हॅक्सिनचा केवळ दुसरा डोस तिला जाईल. हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाइन वर्कर यांच्यासाठी दोन्ही केंद्रावर केवळ दुसरा डोस उपलब्ध असेल.

कोवीशिल्डचे डोस या केंद्रांवर उपलब्ध :
भीम नगर आरोग्य केंद्र, आरेफ कॉलनी, गरमपाणी, हर्षनगर, जिन्सी रंगटीपुरा, औरंगपुरा, बायजीपुरा केंद्र, गांधिनगर, नेहरूनगर, हरसुल मनपा केंद्रीय शाळा, पीर बाजार आरोग्य केंद्र,चिकलठाणा, नारेगाव, जुना बाजार, नक्षत्रवाडी,सिल्कमिल कॉलनी, बन्सीलालनगर,सिडको एन 8,सिडको एन 11, विजय नगर, सातारा, न्यू इंग्लिश स्कूल आयाप्पा मंदिर जवळ, शहा बाजार, मसनतपूर, चेतनानगर (हर्सूल), गणेश कॉलनी, वंदे मातरम शाळा पुंडलिकनगर, जीवन विकास प्रतिष्ठान जय भवानी नगर, सादातनगर, कैसर कॉलनी, मुकुंदवाडी, शिवाजीनगर, मनपाशाळा अजबनगर, छावणी परिषद

कोव्हॅक्सिनचे डोस या केंद्रांवर उपलब्ध :
राजनगर, आरोग्य केंद्र, क्रांती चौक, एमआयटी हॉस्पिटल एन – 4

Leave a Comment