अमेरिकेच्या ‘या’ नागरिकांना मास्क पासून मुक्ती ! राष्ट्राध्यक्ष बायडन यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. भारतासह अनेक देशांत कोरोनाचीची परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र पूर्वी सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या अमेरिकेने मात्र आता सामान्य परिस्थितीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे. अमेरिकेत ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनी मास्क वापरण्याची गरज नाही अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन यांनी केली आहे.

यावेळी बोलताना सीडीसी ने जाहीर केलेल्या नियमावलीची माहिती त्यांनी दिली. सीडीसीने कोरोना लस घेतलेल्या लोकांनी मास्क घालण्याची किंवा सोशल डिस्टंसिंग पाळण्याची गरज नसल्याचं जाहीर केलं. मात्र त्याच वेळी ज्यांचे अजून लसीकरण झालेलं नाही असा नागरिकांनी मास्क बंधनकारक असल्याचे निर्देश सीडीसी ने दिले आहेत. सीडीसीच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधत यावेळी या दोघांनीही मास्क घातला नव्हता. ‘माझ्या मते ही एक मोठी उपलब्धी आहे. अमेरिकेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिन घेतल्याने हे मिळाले. एका वर्षाची कठोर मेहनत आणि अनेकांचा प्राण गमावल्यानंतर आपण मास्क फ्री च्या दिशेने वाटचाल करत आहोत. करोना लस घ्या किंवा मास्क वापरा इतका सोपा आपला नियम आहे’ असं बायडन यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Comment