कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मंत्री सहकार, पणन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2021-22 मधून दोन कोटी मंजूर झाले आहेत. या कामात सातारा, कोरेगाव, खटाव व कोरेगाव तालुक्यातील विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील विकासकामांची यादी
यामध्ये कोरेगांव (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये बंदिस्त गटर बांधकाम करणे 5 लक्ष, शिरवडे (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील नंदकुमार प्रभाकर कांबळे यांच्या घरापासुन ते हायस्कुलपर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष, कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे 8 लक्ष, निगडी (ता.कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीशेजारील ओठ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे 7 लक्ष, मसूर (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीपासुन ते स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण करणे 7 लक्ष, चरेगाव (ता. कराड) येथे मागासवगीय वसाहतीमध्ये लक्ष्मी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे 8 लक्ष,भोसलेवाडी (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे 8 लक्ष, पेरले (ता. कराड) येथे मागासवगीय वसाहतीपासून ते इंदोली फाटा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लक्ष आदी कामांचा समावेश आहे.
सातारा तालुक्यातील विकासकामांची यादी
काशिळ (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लक्ष, मांडवे (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहत (मानेवस्ती व हानसेवस्ती) रस्ता व बोळ काँक्रीटीकरण करणे 5 लक्ष, सासपडे (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता करणे 5 लक्ष, नागठाणे (ता. सातारा) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, अतित (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीपासुन स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, नांदगाव (ता. सातारा) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लक्ष,खोजेवाडी (ता. सातारा) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे 5 लक्ष, निसराळे (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता कांक्रीटीकरण करणे व गटर बांधकाम करणे 5 लक्ष, वेणेगाव (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व गटर बांधकाम करणे 5 लक्ष आदी कामांचा समावेश आहे.
कोरेगांव तालुक्यातील विकासकामांची यादी
बोरगाव (ता. कोरेगांव) येथे मागासवर्गीय वसाहतीच्या कडेला संरक्षक भिंत बांधणे 6 लक्ष, तारगाव (ता. कोरेगांव) येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे 8 लक्ष, सासुर्वे (ता. कोरेगांव) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष, धामणेर (ता. कोरेगांव) येथे मातंग वसाहतीमधील बंदिस्त पाईप गटर बांधणे 8 लक्ष, पिंपरी (ता. कोरेगांव) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लक्ष, साप (ता.कोरेगांव) येथे मागासवगीय वसाहतीशेजारील ओठ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे 5 लक्ष, जायगाव (ता. कोरेगांव) येथे मागासवर्गीय वाढीव वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे 6 लक्ष, न्हावी बु. (ता. कोरेगांव) येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे 8 लक्ष आदी कामांचा समावेश आहे.
खटाव तालुक्यातील विकासकामांची यादी
पुसेसावळी (ता. खटाव) येथील मागासवर्गीय वसाहतीशेजारील ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे 8 लक्ष,होळीचागाव (ता.खटाव) येथील मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 6 लक्ष, राजाचे कुले (ता. खटाव) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे 7 लक्ष, रहाटणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे 7 लक्ष, वडगाव (ज.स्वा.) (ता. खटाव) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे 7 लक्ष, वांझोळी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे 7 लक्ष आदी कामांचा समावेश आहे.