Wednesday, February 8, 2023

जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सुभाष देसाई

- Advertisement -

औरंगाबाद – मागील  दीड वर्षांपासून कोविडच्या परिस्थितीचा आपण मुकाबला करत आहोत. आज कोविडची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे  सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना  मदत देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निधी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे परंतु जिल्ह्यातील विविध विकास कामे होणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरूवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड 19 मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नावे 5 लाख एवढी एकरकमी रक्कम लाभाचे प्रमाणपत्र वितरण, स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाणातील पात्र लाभार्थ्यांना सनदीचे वाटप करण्यात आले. तसेच नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना (POCRA) कामाचे राज्यस्तरीय मुल्यमापन अहवालामध्ये वैजापुर प्रथम, सिल्लोड व्दितीय आणि औरंगाबाद तालुक्याला दहावा क्रमांक  प्राप्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना तर शासनाचा व्दितीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांना मिळाल्याने प्राचार्य अभिजित अल्टे यांना पालकमंत्र्यांनी सन्मानित केले.

- Advertisement -

पालकमंत्री देसाई म्हणाले,  जिल्ह्यातील नुकसानीचा अंदाजे 569 कोटींचा अहवाल बनविलेला आहे. त्याचा देखील पाठपुरावा करण्यात येईल. अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या अनेक पाणीपुरवठा योजनांची तात्काळ दुरूस्ती करावी.  लसीकरणामध्ये जिल्ह्यातील अनेक कंपन्यांनी आपल्या CSR  निधीतून मदत केलेली आहे. लोकप्रतिनिधींनी देखील लसीकरणाच्या विशेष मोहिमांचे आयेाजन करावे असेही ते म्हणाले.