बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत अशा विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान पुणे येथे विविध मान्यवरांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. याठिकाणी पुरंदरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहिला होता. यावेळी यावेळी शासकीय इतमामात बाबासाहेबांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली. त्यानंतर धार्मिक मंत्रोच्चार करीत पार्थिवाला अग्नि देण्यात आला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना गडकिल्ले, शिवकालीन कालखंड आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सखोल माहिती होती. ती त्यांनी आपल्या लेखणीच्या, व्याख्यानाच्या माध्यमातून समाजापुढे मंडळी. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज याची कारकिर्द मोठ्या सुरेख पद्धतीने सर्वांसमोर मांडली.

You might also like