गुडघाभर चिखल तुडवत काढावी लागली अंत्ययात्रा, बीडमधील धक्कादायक घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव-भगवाननगर ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. भगवाननगरमध्ये शंभर कुटुंब राहतात. त्यामुळे लोकसंख्या देखील 800 च्या जवळपास आहे. मात्र या गावाला जोडणारा रस्ता कच्चा असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अंत्यविधीसाठी (funeral procession) जातांना नागरिकांना गुडघाभर पाणी आणि चिखल तुडवत जावे लागते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करताना या गावाच्या वाट्याला रस्त्याचा वनवास मात्र कायम आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वारंवार निवेदन दिले मात्र या रस्त्याचा प्रश्न काही सुटला नाही. या गावात कोंडीबा मुंडे या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना नागरिकांना स्मशानभूमीकडे घेऊन जाताना (funeral procession) तब्बल एक किलोमीटर गुडघाभर चिखलाचा प्रवास पार करावा लागला. मृतक व्यक्तीच्या नातेवाईकांना यावेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला.

या अंत्यंयात्रेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गावच्या या परिस्थितीवरुन गावकऱ्यांकडून संताप (funeral procession) व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षांपासून आम्ही गावातील रस्ता व्यवस्थित व्हावा यासाठी शासन दरबारी खेटा मारल्या. लोकप्रतिनिधींना निवेदन देखील दिले. मात्र रस्त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. यामुळे आता गावकरी सर्वजण संतापलो आहोत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?