मित्रांसोबत वरातीत नाचणे नवरदेवाला पडले चांगलेच महागात; या विचित्र घटनेचा व्हिडिओ तुफान वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. लग्नामधील अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपण आठवण म्हणून कॅमेरामध्ये कैद करत असतो. सध्या सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

http://www.instagram.com/reel/CQOcgaeFoJn/?utm_source=ig_embed&ig_rid=70da2ca7-0053-4106-b1b0-bca602b1251b

असाच एका लग्नातील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाचे मित्र आणि नातेवाईक एका लग्नसमारंभात डान्स करताना दिसत आहे. यामध्ये सगळे लग्न एन्जॉय करताना दिसत आहेत. यामध्ये नवरदेवाचा एक मित्र नवरदेवाला खांद्यावर उचलून नाचताना दिसत आहे. यानंतर जे काही घडले ते पाहून तुम्हालाही हसू आणणार नाही.

नवरदेवाचा मित्र त्याला खांद्यावर घेऊन नाचत असताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि नवरदेव जमिनीवर कोसळतो. ही घटना घडताच सगळे नातेवाईक नवरदेवाला उठवण्यासाठी धाव घेतात. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असून अनेक लोकांनी यावर मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Niranjan नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या निरनिराळ्या कमेंट येत आहेत.

Leave a Comment