गुंड गजा मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या पत्नी आणि मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याची प्रतिक्रिया मारणेंनी पक्षप्रवेशावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस चे पुण्याचे नगराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत जयश्री मारणे यांनी प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे मनसे साठी हा मोठा धक्का बसला आहे.

मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २०१२ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या. मारणे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरू झाले असून येत्या काळात यात आणखी होणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले. महापालिकेची पाच वर्षांची मुदत येत्या १४ मार्चला संपत आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला भाजपाचे विद्यमान १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.

Leave a Comment