गांधींनी काँग्रेस बरखास्त करण्याचा सल्ला दिला होता – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उपराष्ट्रपतींच्या हस्ते ४३७ स्नातकांना पदव्या प्रधान

अहमदनगर प्रतिनिधी

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी काँग्रेस बरखास्त करण्याचा सल्ला दिला होता,’ असे ‌विधान करीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी खळबळ उडवून दिली. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतांनाच उपराष्ट्रपतींनी काँग्रेस पक्षाबाबत असे विधान केल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस या डीम्ड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या १३ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते.

या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर, चान्सलर डॉ. राजेंद्र विखे पाटील हे उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या हस्ते ४३७ स्नातकांना पदव्या प्रधान करण्यात आल्या. त्यात ३१७ पदवीधर, ११४ पदव्युत्तर तर ६ पीएचडी धारकांचा समावेश आहे. १३०० खाटांचे हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.

विद्यापीठातर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाषणाच्या प्रारंभीच काँग्रेसला टार्गेट केले. त्यामुळे शैक्षणिक संकुल हे राजकीय वाकयुद्धात भरडले जात असल्याची प्रचिती यावेळी आली.

Leave a Comment