तब्बल 6 लाखांचा 50 किलो गांजा जप्त; मिरजेत गांजा तस्करीचा पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

रस्त्यावर असणाऱ्या कुपवाड रोडवर दुचाकीवरून पोत्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ६ लाख रुपये किमतीचा ५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

फारुख इस्माईल नदाफ ( वय ४८, रा. आंबा चौक, कुपवाड) आणि फारुख बशीर नदाफ (वय ३१, रा. मानगांव ता.हातकणंगले) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५० किलो गांजा आणि मोटरसायकल असा एकूण ६ लाख ५३ हजार ११० रूपयांचा मुद्देमाल जप्त आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी संशयित फारूख नदाफ हा (एम.एच.१० बी.एच.९०२८) या मोटरसायकलीवरून मिरजेतील हनुमान मंदिराच्या पाठीमागून होमगार्ड कार्यालया समोरून जाणार्‍या कुपवाड सूतगिरणी रोडवर अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी सापळा लावला असता दोघेजण माटारसायकलवरून दोन मोठ्या पिशव्या व बॅग घेऊन आलेले दिसले. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पिशव्या व बॅग मध्ये ६ लाख रूपये किमतीचे ५० किलो गांजाने भरलेले २५ पॅकेट तसेच मोटारसायकल व मोवाईल असा एकुण ६ लाख ५३ हजार ११० रूपयांचा आढळला. सदरचा मुद्देमाल जप्त करून दोघांनाही अटक केली असून या दोघांवर मिरज गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, रविराज फडणीस, विशाल येळेकर, पोलीस अंमलदार सुधिर गोरे, मेघराज रुपनर, अरुण औताडे, संदीप नलावडे, कुबेर खोत, हेमंत ओमासे, इम्राण मुल्ला, चेतन महाजन, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, सुहेल कार्तियानी यांच्या पथकाने केली.

Leave a Comment