Gardening tips : घर लहान असो व मोठे घरामध्ये झर झाडं असतील तर तुमच्या घराची शोभा दुप्पटीने वाढते. त्यातही तुमच्या छोट्या किंवा मोठ्या बागेत गुलाबाचे झाड असेल तर बागेची शोभा वाढते. मात्र बऱ्याचदा आपण नर्सरी (Gardening Tips) मधून रोपे घेऊन येतो त्याला २-४ फुलं लागतात मात्र त्यानंतर त्या रोपाला फुलंच लागत नाहीत. ते रोपटं वाढतं मात्र त्याला फुलांचा बहरच येत नाही. मग अशावेळी काय करायचं ? तुमच्या बागेतील रोपटं कसं फुलेल ? होय आज आम्ही तुम्हाला त्याबाबतच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या रोपट्याला फुलं आणि फळं येतील.
तांदूळ आणि बेकिंग सोडा
हल्ली शहरांमध्ये घरे खूप दाटीवाटीने असल्यामुळे घरातील बाल्कनी मध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येत नाही त्यामुळे झाडांना कीड लागते. त्यामुळे घराच्या घरी कीटकनाशक कसे तयार करायचे हे पाहुयात. जेणेंकरून झाडे चांगली बहरतील. एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात एक मूठ तांदूळ (Gardening Tips ) घाला. त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घाला. हे मिश्रण चांगलं एकजीव करा त्यामध्ये व्हाईट व्हिनेगरचे काही थेंब टाका मग हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये भरा. पानं पिवळी पडलेल्या किंवा सुकलेल्या रोपांवर स्प्रे बाटलीने हे मिश्रण फवारा. साधारण दोन ते तीन दिवस हे मिश्रण रोपांवर फवारल्यानंतर नवीन पालवी फुटण्यास मदत होते.
कडुनिंब(Gardening Tips )
कडूलिंबामधे कीडविरोधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग झाडांवरील कीड घालवण्यासाठीही करता येतो. यासाठी कडूलिंबाची भरपूर पानं घ्यावीत, ती मोठ्या भांड्यात पाण्यात भिजवून ठेवावीत. सकाळी हेच पाणी चांगलं उकळून घ्यावं. थंड करुन हे पाणी स्प्रे बॉटलमधे भरुन झाडांवर फवारावं. कीड असेपर्यंत हे करत राहावे, त्याचा कीड जाण्यास फायदा होतो. झाडांवर कीड नसली तरी झाडांचं कीडीपासून संरक्षण (Gardening Tips ) होण्यासाठी आठवड्यातून एकदा कडूलिंबाचा काढा फवारावा.