Gas Lighter Cleaning Tips : कळकट , मळकट लायटर ला बनवा नव्यासारखा चकचकीत ;वापरा सोप्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gas Lighter Cleaning Tips : गृहिणींनो आजची ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. प्रत्येक गृहिणीचे हक्काचे ठिकाण म्हणजे कीचन… गृहिणींना आपल्या स्वयंपाक घरातील प्रत्येक वस्तू टापटीप आणि स्वच्छ असायला हवी असते. पण बऱ्याचदा किचन ओट्यावरच्या काही वस्तू अशा असतात ज्या सहजपणे स्वच्छ केल्या जात नाहीत. घरातल्या किचन ओट्यावरची ही वस्तू म्हणजे ‘लायटर’. (Gas Lighter Cleaning Tips) सध्याचा जमाना आधुनिक आहे. बऱ्याच घरांमध्ये विना लायटर गॅस शेगड्या आल्या असल्या तरी आजही अनेक घरात लायटर हा हमखास वापरला जातो.

अनेकदा पाणी लागल्यावर हा लाईटर खराब होतो म्हणून स्वच्छ केलाच जात नाही. त्यामुळे तो अगदीच अस्वच्छ आणि तेलकट , मळकट होऊन जातो. आजच्या या लेखात आम्ही तुमहाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा लायटर स्वच्छ तर होईलच पण तो खराबही होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया…

बेकिंग सोडा

आपल्या घरी बेकिंग सोडा हमखास असतो याचा वापर तुम्ही लायटर (Gas Lighter Cleaning Tips) साफ करण्यासाठी करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घ्या त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट लाईटर वर लावा वीस मिनिटांसाठी तसेच ठेवा. वीस मिनिटं नंतर कोरड्या कापडाने पेस्ट काढा. पेस्ट बरोबर चिकट डागही निघतील.

तांदळाचे पाणी

यासाठी एका वाटीत दोन चमचे तांदळाचे पाणी घ्या त्यात इनो मिक्स करून पेस्ट तयार करा तयार पेस्ट लाईटर (Gas Lighter Cleaning Tips) वर लावा पंधरा मिनिटानंतर स्क्रबर किंवा कोरड्या कापडाने पेस्ट पुसून काढा. त्यामुळे चिकट डाग काही मिनिटात दूर होतील.

टूथपेस्ट

टूथपेस्ट फक्त दात चमकवण्यासाठी कामी येत नसून याचे आणखी देखील उपाय आहेत. लाइटर (Gas Lighter Cleaning Tips) साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लाईटर वर टूथपेस्ट लावून कोट करा. सकाळी स्क्रबर ने लाईटर घासून काढा त्यामुळे काळपट पडलेला लाईटर चमकेल.

लाईटर मध्ये पाणी गेल्यामुळे अनेक वेळा लाइटर्स स्पार्क होत नाही. त्यामुळे लाईटर(Gas Lighter Cleaning Tips)   नेहमी कोरड्या कापडाने स्वच्छ करा. काही वेळ उन्हात ठेवा यामुळे लाईटर व्यवस्थित काम करेल.