गौतम अदानींना आज मिळणार USIBC ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांनी अलीकडेच जगातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जा प्राप्त केला आहे, आता त्यांना एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळणार आहे. यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल – यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) ने गौतम अदानी यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड देण्याची घोषणा केली आहे. अदानी यांना त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची दखल घेऊन USIBC 2022 ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येईल.

आज 7 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या USIBC च्या इंडिया आयडियाज समिटमध्ये अदानी यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येईल. 2007 पासून भारत आणि अमेरिकेतील आघाडीच्या उद्योजकांना द्विपक्षीय व्यावसायिक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार Amazon चे प्रमुख जेफ बेझोस, Google CEO सुंदर पिचाई, Nasdaq चे प्रमुख Adena Friedman, FedEx कॉर्पोरेशनचे प्रमुख फ्रेड स्मिथ आणि कोटक महिंद्रा बँकेचे प्रमुख उदय कोटक यांना देण्यात आले आहे.

दरम्यान, अदानी समूहाच्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अदानींची नेटवर्थ झपाट्याने वाढली आहे. 2022 हे वर्ष अदानींसाठी उत्तम वर्ष ठरले आहे. अदानीच्या मालमत्तेत या वर्षी जलद गतीने वाढ झाली आहे. गेले काही महिने गौतम अदानी यांच्यासाठी व्यवसायाच्या आघाडीवरही चांगले ठरले आहेत. यादरम्यान त्यांनी एकामागून एक अनेक महत्त्वाचे सौदे केले. मे महिन्यात गौतम अदानी यांच्या कंपनीने होल्सीमचा भारतीय सिमेंट व्यवसाय ताब्यात घेण्याची घोषणा केली.