‘गौतम गंभीर’चं अभिमानास्पद पाऊल; १०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार

विशेष प्रतिनिधी । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून, गंभीर १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

या सर्व मुलांच्या शहीद वडिलांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे, यासाठी आपण त्याने कायम ऋणी राहणार आहोत हे दाखवण्याची वेळ आता आली आहे, असं म्हणत गंभीरने या नवीन उपक्रमाबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान गौतम गंभीरने सोमवारी वयाच्या ३९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने क्रिकेट नंतर आणखी एक नवी ‘इनिंग’ काही दिवसांपूर्वी सुरु केली होती. दिवंगत केद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर गौतम गंभीरला ‘भाजपा’कडून लोकसभेची उमेदवारी मिळावी आणि तो लोकसभेत निवडून आला होता. गंभीर ने या आधी देखील समाजोपयोगी कामे केली होती. काही दिवसांपूर्वी भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी तो पुढे आला होता. आजच्या त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याने उचलेले हे पाउल वेगळेपण दर्शवत आहे. आज या निर्णयामुळे वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांसह कौतुकाचा देखील वर्षाव होत आहे.