एकही स्पर्धा न हरलेल्या Boxer Musa Yamakचा स्पर्धेदरम्यान हार्ट अटॅकने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मृत्यू कोणाला कधी येईल याचा काही नेम नाही. एका प्रसिद्ध बॉक्सरचा स्पर्धेदरम्यान अचानक मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध बॉक्सर मुसा यमकला (Boxer Musa Yamak) बॉक्सिंग करताना अचानक हार्ट अटॅक आला आणि तो तिथेच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे. टर्कीश-जर्मन बॉक्सर मुसा (Boxer Musa Yamak) 38 वर्षांचा होता. आतापर्यंत जितक्या स्पर्धा झाला त्या स्पर्धेत रिंगमध्ये बॉक्सिंग करताना तो कधीच हरला नाही. पण याच रिंगमध्ये मृत्यूने त्याला हरवले आहे.

https://twitter.com/CyprusNik/status/1526546655914635264

जर्मनीत झालेल्या या बॉक्सिंगमध्ये मुसासमोर युगांडाचा हमजा वांडेरा होता. स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू असताना मुसाला एक तीव्र झटका आला. त्यानंतरही त्याने तिसऱ्या टप्प्यात लढण्याचा प्रयत्न केला. पण तिसरा राऊंड सुरू होण्याआधीच तो अचानक बेशुद्ध झाला आणि रिंगमध्येच कोसळला. यानंतर तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात आले मात्र त्याचा जीव वाचवण्यात अपयश आले. मुसाच्या करिअरमधील ही नववी प्रोफेशनल स्पर्धा होती. जी त्याच्या आयुष्यातील शेवटची स्पर्धा ठरली आहे.

मुसाच्या या शेवटच्या स्पर्धेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @CyprusNik या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मुसा (Boxer Musa Yamak) फाइटआधीच कोसळताना दिसत आहे. मुसाने 2017 साली बॉक्सिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. मागच्या वर्षी त्याने WBFed आंतरराष्ट्रीय किताब पटकावला होता.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

 

Leave a Comment