शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आता 31 जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्यांनाच मिळेल सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेतकरी असल्यास आपल्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. खरिपाच्या पिकांना दुष्काळ, पूर, भूस्खलन, अवकाळी पाऊस, गारपीट, कीटकांचे हल्ले, नैसर्गिक अग्नि आणि चक्रीवादळ यांसारख्या जोखमीपासून संरक्षण द्यायचे असेल तर पंतप्रधान पीक विमा योजना घ्या. आता पीक विम्यासाठीचे रजिस्ट्रेशन मोफत केले आहे. फक्त प्रीमियम जमा करावा लागेल. धान्य व तेलबिया या पिकासाठी केवळ 2 टक्के तर वाणिज्यिक आणि बागायती पिकांसाठी विम्याच्या रक्कमेवर 5 टक्के इतका विमा उतरविला जाऊ शकतो. उर्वरित प्रीमियम हा केंद्र सरकार व राज्य सरकार जमा करतील.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा उतरवावा असे आवाहन केलेले आहे, जेणेकरून पिकांचे नुकसान होण्याचा धोका कमी होऊ शकेल. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. केंद्रशासित प्रदेशात त्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे.

कृषिमंत्री याबाबत म्हणाले की, ही पीक विमा योजना पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत संपूर्ण पीक चक्र कार्यात होणाऱ्या नुकसानीविरूद्ध संरक्षण मिळवून देते. खरीप हंगाम -2020 पासून सरकारने ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक केली आहे. तर सरकारी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना अनिवार्य होती.

आता कर्जाची थकबाकी असलेले शेतकरी आपल्या बँकेच्या शाखेत रजिस्ट्रेशनच्या कट-ऑफ तारखेच्या सात दिवस अगोदर एक साधारण घोषणा पत्र देऊन या योजनेतून स्वतःला दूर करू शकतात.

शेतकरी रजिस्ट्रेशन कोठे करू शकतात?
-जवळची बँक, प्राथमिक कृषी पत संस्था, सामान्य सेवा केंद्र (सीएससी), गाव पातळीवरील उद्योजक (व्हीएलई), कृषी विभाग कार्यालये, विमा कंपनी प्रतिनिधी किंवा थेट राष्ट्रीय पीक योजना पोर्टलवर यासाठीचे रजिस्ट्रेशन करता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment