Friday, January 27, 2023

‘नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!’ पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन

- Advertisement -

मुंबई । दरवर्षी भगवान गडावर भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थकांचा भव्य दसरा मेळावा होत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळं इतर सण-उत्सवांप्रमाणे भगवान गडावरील मेळाव्याला मर्यादा आल्या आहेत. कोरोनामुळं यंदाचा दसरा मेळावा आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होत सर्वानी साजरा करायचे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. ”दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. मी सुद्धा या मेळाव्याची वाट पाहत असते. पण, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत ,असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. मी स्वत: भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
”दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. मी सुद्धा या मेळाव्याची वाट पाहत असते. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरू केली आहे, ती आपण पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे. पण, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थिती असल्यामुळे यंदा तुम्हा सर्वांचे आरोग्य मला धोक्यात घालायचे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत. आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हायचे आहे. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम करायचा आहे”, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केले.

- Advertisement -

”माझा मेळावा कसा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी कालच मराठवाड्याचा दौरा केला. तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. आपल्या दसऱ्या मेळाव्याला दरवर्षी लाखोंची गर्दी जमा होत असते. सावरगाव इथं लाखो कार्यकर्ते हे भगवानगडावर जमा होत असतात, त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले. मी स्वत: भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. चला मग या नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजन तयार व्हा,” असे आवाहन पंकजा यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in