घनसावंगी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाची स्ट्रॅटर्जी अशी आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात महाराष्ट्राला सुखरूप मोठ्या संकटातून बाहेर काढण्यात अनेकांचा वाटा राहिला पण त्यात अगदी ठळकपणे उल्लेख करावा लागेल तो तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा… पत्रकार परिषदा घेण्यापासून टोपेंनी ओन फिल्ड केलेल काम हा त्यांच्याही आयुष्यातला माईल्डस्टोन असावा… पण याच टोपेंचं राजकारण जिवंत राहतं ते त्यांच्या हक्काच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामुळे… सलग पाच टर्म 25 वर्ष घनसावंगीची जनता त्यांच्यावर निखळ प्रेम करत आलीये… पण 2024 उजाडताना महाराष्ट्राच्या राजकारणाचा पटच उलटा सुलटा होऊन गेलाय… घनसावंगीत राष्ट्रवादीचे दोन पक्ष झालेत… त्यातल्या शरद पवारांच्या बाजूने राजेश टोपे आहेत… त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी हिकमत उडान आणि शिवाजी चोथेही महाविकास आघाडीचाच भाग आहेत… त्यामुळे सीनियॉरीटी आणि ज्याचा आमदार त्याला तिकीट हे फिल्टर लावून पाहिले तर मविआकडून टोपे साहेबांचे तिकीट फिक्स आहे… त्यामुळे उडान किंवा चोथे या दोघांनाही सध्यातरी दोनच पर्याय शिल्लक उरतात एकतर निवडणुकीत अपक्ष लढत देणे… किंवा महायुतीतील एखादा झेंडा हाती घेणे… शरद पवारांचे एकनिष्ठ असल्याने आणि अजितदादा ज्यांच्यावर दात ओठ खाऊन असतात, असं बोललं जातं त्या राजेश टोपे यांचं पॉलिटिकल करिअर संपवण्यासाठी दादा घनसावंगीत नेमकं कोणता राजकारण शिजवतायत? त्याचीच ही कहाणी…

घनसावंगी…हा मतदारसंघ हा बघायला गेलं तर जालना जिल्ह्यात मोडत असला तरी लोकसभेला हा परभणीच्या अंतर्गत येतो… ज्यांना शहरापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर पासून या मतदारसंघाचा चहुबाजूने विस्तार झालाय… 2009 च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा नवा घनसावंगी मतदारसंघ अस्तित्वात आला… त्यापूर्वी त्याचं नाव अंबड असं होतं… राजेश टोपेंना राजकारणाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. त्यांचे वडील अंकुशराव टोपे हे स्वतः खासदार होते. ते शरद पवारांच्या जवळचे समजले जायचे. जालना जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांचा विकास करण्यातही अंकुशराव टोपे यांचा महत्त्वाचा वाटा होता….

YouTube video player

वडिलांनी उभारलेल्या अनेक संस्थांच्या प्रमुखपदांची जबाबदारी त्यांच्या हयातीतच राजेश टोपे यांच्याकडे आली. अंकुशनगर इथला सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा संस्थात्मक कामांची जबाबदारी राजेश टोपेंनी सांभाळली. या संस्थांच्या माध्यातून राजेश टोपेंनी जिल्हा आणि त्यांचा मतदारसंघ घनसावंगीमध्ये चांगला जनसंपर्क जपला… याच्यात जोरावर त्यांनी 1995 ला विधानसभेला लढत देऊन पाहिली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला… अखेर 1999 ला ते मतदार संघातून आमदार झाले… यानंतर मात्र त्यांनी मतदारसंघावरची आपली पकड तसूभरही कमी होऊ दिली नाही… 2009 ला नव्याने तयार झालेल्या घनसावंगी विधानसभेत राष्ट्रवादीकडून राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांच्यात लढत झाली… मात्र तब्बल 23 हजार मतांनी टोपेंनी खोतकरांचा निकालात धुव्वा उडवून दिला… 2014 ला घनसावंगीत तिहेरी लढत झाली… राष्ट्रवादीकडून टोपे विरुद्ध भाजपकडून विलास खरात तर तिसरीकडे अगदी ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेले भाजपचे डॉक्टर हिकमत उडान या तिहेरी लढतीतही विजय मिळवला तो राजेश टोपे यांनीच…

मात्र 2019 ला जिल्ह्याचं राजकारण राष्ट्रवादीच्या आणि पर्यायाने राजेश टोपे यांचे विरोधात गेलं होतं… तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत हिकमत उडान यांनी घनसावंगीत पायाला भिंगरी बांधून काम केल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला तब्बल 24 हजारांच लीड मिळालं होतं… हा आकडा स्पष्ट सांगत होता की टोपे यांचा पराभव फिक्स आहे… मात्र 2019 लाही टोपे निवडून आले… पण शिवसेनेच्या हिकमत उडान यांच्या विरोधात अवघ 3400 मतांचेच लीड मिळवण्यात टोपेंना यश आलं… हा विजयाचा आकडा त्यांच्या पायाखालची फक्त वाळूच सरकवणारा नाही तर टोपेंच्या राजकारणावर आभाळही आणणार होता…म्हणूनच मागील पाच वर्षात गाव पातळीवरचा कनेक्ट वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिला आहे… महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य मंत्री पदाचा कारभार सांभाळतानाच कोरोनाचं संकट आलं… मात्र या संकटाने अजिबात ना डगमगळता टोपेंनी केलेल्या कामाची संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही दखल घेतली… थोडक्यात आरोग्यमंत्रीपद आणि कोरोनाच्या काळात केलेलं काम यामुळे त्यांची पॉलिटिकल इमेज मोठी झालीच, पण सोबतच पक्षातील वजन वाढायलाही मदत झाली…

खरंतर टोपेंच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर सरकारच्या अनेक निर्णयांमध्ये टोपेंचा धोरणात्मक वाटा राहिलाय… राजेश टोपे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असताना नवीन विद्यापीठ कायदा संमत झाला होता. या कायद्यामुळे कुलगुरूंची स्वायत्तता कमी करण्यात आली होती. या निर्णयावर त्यावेळी खूप टीकाही झाली होती…. यासोबतच नगरविकास, जलसंधारण, संसदीय कार्य, सामान्य प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री पदाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी राहिलाय… टोपे हे त्यांच्या वडिलांपासूनच शरद पवारांच्या जास्त जवळचे राहिलेत… त्याच राजकीय आणि कौटुंबिक वारसाला न्याय देत राष्ट्रवादीच्या पक्षफुटीत टोपे हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले… यामुळे त्यांना आगामी विधानसभेला काही अधिक प्रमाणात सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही… त्यासोबतच अजित दादा आणि राजेश टोपे यांच्यात फारसं जमत नसल्याचेही अनेक उदाहरणं राजकीय वर्तुळात चर्चेत असतात… या सगळ्या पक्ष अदलाबदलीच्या कार्यक्रमात मात्र आश्चर्य वाटाव असं राजेश टोपे यांचे दोन प्रतिस्पर्धी एक म्हणजे डॉ. हिकमत उडान आणि दुसरं नाव शिवाजी चोथे हे दोघेही महाविकास आघाडी सोबतच राहिल्याने अजितदादांना मतदारसंघातील नवा कोरा चेहरा किंवा या दोघांपैकी एकाला ऐन टाइमिंगला गळाला लावत टोपेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवावं लागणार आहे, एवढं मात्र नक्की…

बाकी राजेश टोपेंच्या राजकीय ताकदीचा अनुभव घ्यायचा असेल तर आधी आपल्याला त्यांच्या संस्थात्मक जाळ्यावर एकवार नजर टाकावी लागते… ज्यामध्ये समर्थ सहकारी साखर कारखाना, सागर सहकारी साखर कारखाना, यशवंत सहकारी सूतगिरणी, समर्थ सहकारी बँक, मत्स्योदरी शिक्षण संस्था असा भला मोठा संस्थांचा पसारा मतदारसंघ आणि मतदारसंघ बाहेरही पसरल्यामुळे एक हक्काची वोट बँक कायमच त्यांच्या सोबत असते… त्यात शिक्षण मंत्री असताना तयार झालेली इमेज, महायुतीच्या विरोधी असणारी लाट, तगडा प्रतिस्पर्धी नसणे, शरद पवारांच्या बाजूची सहानुभूती, संस्थात्मक जाळ या सगळ्यांची बेरीज करून पाहिली तर येणाऱ्या 2024 च्या विधानसभेलाही राजेश टोपे यांचा विजय प्लसमध्ये दिसतो…

टोपेंच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न घनसावंगीत तसा भाजपकडून सुरूच आहे… त्यात मतदार संघातील खाजगी कारखानदार सतीश घाडगे यांचा नुकताच भाजप पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला… त्यांच्या उसाचे कार्यक्षेत्र मोठ असल्यामुळे ते नक्कीच मतांची महायुतीच्या बाजूने गोळा बेरीज करण्यामध्ये प्रभाव पाडू शकतात… त्यातही भाजपचे माजी आमदार विलास खरात हे किंवा त्यांचा मुलगा विश्वजीत खरात हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत… त्यामुळे राजेश टोपेंच्या मतदारसंघातील सलग डबल हॅट्रिक रोखण्यासाठी अजितदादा काही राजकीय पेरणी करतील का? की भाजप आमदार संघ आपल्याकडे खेचून आणत टोपेंना कडव आव्हान उभं करतील? घनसावंगीचा 2024 चा आमदार कोण? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा