मुंबई : हॅलो महाराष्ट्र – फक्त 30 हजार लोकसंख्या असलेल्या जिब्राल्टर या देशाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विश्वविक्रम (World Record) आपल्या नावावर केला आहे. या देशाच्या आंतरराष्ट्रीय टीमच्या ओपनरनी पूर्ण 20 ओव्हर बॅटिंग करण्याचा विक्रम केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमने एकही विकेट न गमावता 20 ओव्हर बॅटिंग करण्याचा कारनामा केला आहे. जिब्राल्टर आयसीसीचा असोसिएट सदस्य आहे. वालिटा कपदरम्यान जिब्राल्टर आणि बुल्गारिया या दोन देशांमध्ये झालेल्या सामन्यात हा विक्रम (World Record) करण्यात आला आहे. जिब्राल्टरने पहिली बॅटिंग करत एकही विकेट न गमावता 213 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना बुल्गारियाला 6 विकेट गमावून 192 रन करता आले. त्यामुळे जिब्राल्टरचा या सामन्यात 21 धावांनी विजय झाला.
या मॅचमध्ये जिब्राल्टरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. कर्णधार बालाजी पाय आणि लुईस ब्रुस यांनी 20 ओव्हर बॅटिंग करून ते नाबाद राहिले. ब्रुस याचे शतक एका रनने हुकलं, तो 99 रनवर नाबाद राहिला. 63 बॉलमध्ये केलेल्या या खेळीमध्ये त्याने 11 फोर आणि 2 सिक्स मारले.तर पायने 59 बॉलमध्ये नाबाद 86 रन केले, ज्यात 11 फोर आणि एक सिक्स लगावला आहे. जिब्राल्टरला 28 रन फक्त एक्स्ट्राच्या माध्यमातून मिळाल्या. बुल्गारियाने या सामन्यात 8 बॉलरचा वापर केला, पण एकालाही विकेट घेण्यात यश आले नाही.
जिब्राल्टरने दिलेल्या 213 धावांचा पाठलाग करताना बुल्गारियाची चांगली सुरूवात झाली. 8 ओव्हरमध्ये त्यांचा स्कोअर 1 विकेटवर 87 रन होोता, पण त्यांना शेवटी 6 विकेट गमावून 192 रनच करता आले. या सामन्यात बुल्गारियाच्या सॅम हुसेनने 31 बॉलमध्ये सर्वाधिक 64 रन केले, यात 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. 40 वर्षांच्या बालाजी पाय याची ही 13वी आंतरराष्ट्रीय मॅच आहे. 45 च्या सरासरीने त्याने 493 रन केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 14 विकेटही घेतल्या आहेत.
हे पण वाचा :
लग्नानंतर नवरा-नवरीने स्वत:ला घेतले पेटवून, उपस्थित पाहुण्यांनासुद्धा बसला धक्का!
पुणे रेल्वे स्टेशनवर आढळली संशयास्पद वस्तू?; पोलिसांनी तपासात दिला ‘हा’ प्राथमिक निष्कर्ष
जयकुमार गोरेंचे सहकारी महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी