राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल महाजन म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश कधी करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर गिरीष महाजन यांनी दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशाचा मुहूर्त काढणे फक्त बाकी आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा निश्चित होणार आहे असे गिरीष महाजन म्हणाले आहेत.

कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार

गिरीष महाजन यांची त्यांच्या शासकीय निवास स्थानी भेट घेवून सुजय विखे पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिली याबद्दल आभार मानले. लोकसभा निकाला नंतर गिरीष महाजन यांची सुजय विखे पाटील यांनी प्रथमच भेट घेतली होती.सुजय विखे पाटील यांच्या सोबत त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील देखील गिरीष महाजन यांच्या घरी गेले होते.

पृथ्वीराज चव्हाण होणार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष

पंतप्रधान पदाचा शपथविधी झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त काढण्यात येईल अशी माहिती गिरीष महाजन यांनी दिली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. वेळोवेळी त्या नेत्यांना देखील पक्षात प्रवेश देण्यात येईल असे गिरीष महाजन म्हणाले आहेत.

Leave a Comment