धक्कादायक! मेहुणीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | मेहुणीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढून तिला लग्नासाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद येथे घडला अाहे. अहमद शेख अस आरोपीचे नाव असून जिल्हा व सत्र न्यायालयाने आज त्याचा अटक पुर्व जामिन फेटाळला.

हाती आलेल्या माहितीनुसार, पिडित २४ वर्षीय युवतीच्या बहिणीसोबत अहमदचे लग्न झाले होते. त्यामुळे अहमदच्या तिच्या घरी जाणे येणे होते. यावेळी त्याने युवतीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ केला होता. जानेवारी मधे युवतीला लग्नाकरता एक स्थळ आले असता त्यांना नाही म्हणुन सांगा अशी धमकी अहमदने दिली. तसेच पिडीतेला आपल्याकडे तुझे अंघोळ करतानाचे अश्लिल फोटो आहेत. तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर ते तुझ्या होणार्या न्हवर्याला पाठवून लग्न मोडेन असे धमकावले. त्यानुसार अहमदने मुलाच्या आईला फोटो पाठवून युवतीचे लग्नही मोडले. त्यानंतर पिडितेने पोलीसांत धाव घेतली.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला असता जिल्हा सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. पोलीस अधिकचा तपास करत आजेत.

Leave a Comment