विवाहित महिलेने लग्नास नकार दिला म्हणून नाराज तरूणाने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीच्या मथुरा जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने लग्नास नकार देणाऱ्या महिलेचे काही खाजगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते.

पीडित महिलेने सांगितले कि एक वर्षाआधी तिची ओळख मनवीर नावाच्या तरूणासोबत झाली होती. या तरुणाला तिच्यासोबत लग्न करायचे होते. यानंतर हि महिला त्याच्या जाळयात अडकली. दोन महिन्यांपूर्वी हा तरुण पीडित महिलेला आपल्या घरी घेऊन आला. महिला त्याच्या घरी तीन दिवस राहिली. यावेळी या तरुणाने त्याच्या मोबाइलमध्ये महिलेचे काही प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ काढले. यानंतर या महिलेला समजले कि हा तरुण काहीच कामधंदा करत नाही. त्यानंतर या पीडित महिलेचे मन बदलले आणि तिने लग्नास नकार दिला.

या महिलेने लग्न करण्यास नकार दिल्याने या तरुणाने रागाच्या भरात महिलेची बदनामी करण्यासाठी तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ फेसबुकवर शेअर केले. महिलेच्या तक्रारीवरून तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी केली जात असून रिपोर्टच्या आधारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकारी राजित वर्मा यांनी दिली आहे.