Tuesday, June 6, 2023

गर्लफ्रेंडने लग्नासाठी तगादा लावला; लिव्हइनमध्ये राहणार्‍या बाॅयफ्रेंडने खून करून मृतदेह भिंतीत गाडला

पालघर | माथेफिरू लोक काय आणि कसे कांड करतील याचा काही नेम नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत नसेल तर ते कुठल्याही थराला जाऊन ती गोष्ट मिटवण्याचा प्रयत्न करू शकतात. अशीच एक घटना पालघर येथील वानगाव मध्ये घडली आहे. येथील तीस वर्षाच्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडचा ती लग्नाचा तगादा लावते म्हणून खून केला आणि तिचा मृतदेह घराच्या भिंती मध्ये गाडून टाकला.

तरुण आणि तरुणी लिव- इन- रिलेशनशिपमध्ये गेली पाच वर्षे राहत होते. दोघांमध्ये लग्नासाठी वाद निर्माण होत होता. सगळ्यात शेवटी दोघांना एकत्र 21 ऑक्टोबर या दिवशी काही लोकांनी पाहिले. यानंतर तरुणी गायब झाली. तरुणीच्या घरच्यांनी विचारले असता, ती गुजरात येथील वापी गुजरात येथे गेली असून लवकर परतेल. असे तो तिच्या घरच्यांना सांगत असे.

पोलिसांना शंका आल्यानंतर त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. भिंती पाडून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला असून. आरोपीवर भारतीय दंड संहिता IPC 302 आणि इतर कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.