प्रेम एकीवर आणि लग्न दुसरीबरोबर; विरह सहन न झाल्याने प्रेयसीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

पुणे : हॅलो महाराष्ट्र – प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी संसार थाटल्यानं पुण्यातील एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रियकरानं प्रेमात धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानं नैराश्यात गेलेल्या 22 वर्षीय तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास सुरु करत आहेत.

मनिषा गोविंद गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचं नाव असून ती फुरसुंगी परिसरामध्ये राहते. मागच्या काही दिवसांपासून तिचं हडपसर परिसरातील पानमळा येथे राहणाऱ्या नितीन दत्तात्रय गायकवाड या मुलाशी प्रेमसंबंध सुरू होते. यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती नितीनच्या आई वडिलांनादेखील होती. असे असूनसुद्धा त्यांनी आपल्या मुलाचा विवाह अन्य एका मुलीशी लावून दिला.

आपल्या प्रियकरानं परस्पर दुसऱ्या मुलीशी संसार थाटल्याचं कळताच मनिषा नैराश्यात गेली.याच नैराश्यातून तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मृत मनिषाचे वडील गोविंद यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई-वडिलांवरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like