मोदींनी गुजरातपेक्षा अधिक मदत महाराष्ट्र आणि केरळला करावी; भाजप खासदाराचा घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केली. महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोदी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यावरून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींना घरचा आहेर दिला आहे.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, की पंतप्रधान गुजरातला गेले आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपयांचा धनादेश दिला. आता त्यांनी प्रामाणिकपणे यापेक्षा अधिक रकमेचा धनादेश महाराष्ट्र आणि केरळला दिला पाहिजे. या ठिकाणी अधिक नुकसान झाले आहे. मात्र, मोदींना त्याची पाहणी करण्यासाठी जाता आले नाही.

दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी देखील सरकारला च खडेबोल सुनावलं होते. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी कमी पडले असून कोरोना परिस्थितीत नेतृत्व नितीन गडकरी यांच्या कडे द्यावे अशी मागणी त्यांनी यापूर्वी केली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment